राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी गणरायांचे आगमन झाले मंत्री आदिती तटकरे,माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.मंत्रोच्चार व बाप्पांच्या जयघोषात तटकरे कुटुंबीय रंगले होते सर्वांनी आरती करत मनोभावे पूजा केली. पुढील वर्षांत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुसज्ज करण्याचा संकल्प खासदार सुनील तटकरे यांनी केला तर मंत्री आदिती तटकरे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.