एकीकडे गणेशोत्सवाची धुमदाम सुरू असताना दुसरीकडे शहापूर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. शहापूरच्या आसनगाव येथील मुंडेवाडी येथे काल सायंकाळच्या सुमारास गणेश विसर्जनासाठी गेलेले पाच तरुण अचानक नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाल्याने भारंगी नदीत बुडाले. माहिती मिळताच जीव रक्षक टीम घटनास्थळी दाखल झाले आणि दोन तरुणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर एकाचा मृतदेह बाहेर काढला. मात्र 2जण अद्याप पर्यंत बेपत्ता असून आज सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केले आहे. परंतु घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.