लोणी काळभोर पोलीसांनी दि. ३०/०८/२०२५ रोजी पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीरित्या गस्त घालून, कर्णकर्कष्य आवाज काढhत तसेच बुलेटचे फटाक्यांसारखे आवाज काढत बुलेट दुचाकी चालवीणारे एकुण १८ दुचाकी चालकांच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेतल्या. सदर दुचाकीचे सायलेन्सर चेक केले असता ते कंपनीचे नसल्याने त्यांचेवर हडपसर वाहतुक विभागाच्यामार्फत कायदेशिर कारवाई करुन एकुण १८,०००/- रु. चा दंड वसुल करण्यात आला आहे. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे