दहिगाव या गावात इमरान पटेल या २१ वर्षीय तरुणाची ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी या तरुणांनी कोयत्याने वार करून हत्या केली होती. तेव्हा या दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली व या गुन्ह्यात अजून काही आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील तपास यावल पोलीस करीत आहे.