शासनाने ई पीक पाहणीची शेवटची तारीख 14 सप्टेंबर जाहीर केली आहे आधीच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करतांना अनेक अडचणी येत असतांना अशातच देवगाव येथे तर मात्र लोकेशन चुकीचा दाखवत असल्याने देवगाव वाशी चांगलेच त्रस्त झाले आहे देवगाव येथील शेतीचा गट नंबर शेतात लोकेशन मात्र धरणात दाखवत आहे येथील नागरिकांनी दिनांक 25 ऑगस्टला तहसीलदार आर्णी, तालुका कृषी अधिकारी, व भूमी अभिलेख कार्यालयाला तक्रार देऊन निर्माण झालेली अडचण दूर करण्याची मागणी केली तब्बल 15 दिवस लोटले तरी अजून पर्यंत अडचण सोडविण्यात आली न