तेल्हारा तहसील कार्यालयावर आज आसूड मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा या प्रमुख मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कापुस, सोयाबीन व तुरीला उत्पादन खर्च आधारित दिडपट हमी भाव द्या..शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेत मजुर कल्याण महामंडळ स्थापन करा....तेल्हारा तालुक्यातील गावांना वाण धरणातुन तत्काळ पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरु करा अशी मागणी केली.