रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथे आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, शेतकरी शालिग्राम तुळशीराम लाहुडकर वय 52 वर्ष रा पिंपरी गवळी हे शेतात फवारणी करीत होते. अचानक त्यांच्या वर रानडुकराने हल्ला केला.या हल्ल्यात शेतकरी शालिग्राम लाहुडकर जखमी झाले त्यांना लगेच खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.