महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची पोत दुचाकीवरील अज्ञात इसमाने बळजबरीने खेचून नेल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.फिर्यादी लता पांडुरंग सोनवणे ही महिला सम्राट स्वीट्सकडून कॉलनी रोडने घराकडे जात होती.त्यावेळी मोपेड सारख्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची व पावणेदोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.