जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात बकऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तीन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्या मुद्देमाल व दोन मोटारसायकली मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जप्त केले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.