राष्ट्रीय मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर मंगळवेढा शिवारात मेंढ्यांच्या कळपाला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पाच मेंढ्या व एक शेळी जागीच ठार झाल्या तर सहा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी म्हाळाप्पा सत्याप्पा गावडे (रा. चिकोडी) हे मेंढपाळ असून ते आपल्या सुमारे दीडशे शेळ्या व मेंढ्या घेऊन चाऱ्यासाठी मंगळवेढा शिवारात आले होते.