रत्नागिरी : शासनाकडुन प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यासाठी दि. 11 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 या कालावधीदरम्यान“जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह ’’निमित्ताने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजन नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन,कुटुंब नियोजन विषयक जनजागृती रॅली, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर कुटुंब नियोजन साधनांचे मोफत वितरण व गृहभेटीतुन माहिती तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.