तालुक्यात व शहरात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून घरगुती गणेश विसर्जन करण्याकरिता नगर परिषदेकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. सोबतच दुर्वा, हार ,फुल, नारळ सारख्या वस्तू टाकण्यासाठी निर्माल् कळस त्या ठेवण्यात आले आहे .सर्व घरगुती विसर्जन करणाऱ्या नागरिकांचे नगर परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे .कृत्रिम तलावाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने भारी अंतकरणाने डोळे नम करून नागरिकांनी बाप्पाचे विसर्जन केले.