भंडारा नगर परिषदेच्या हद्दीतील अशरफी नगर, तकिया वॉर्ड (प्रभाग क्र. १०) येथील पवार यांच्या घरासमोरील बहाद्दरटीका रस्ता मोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्थेत आला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक या मार्गाने प्रवास करतात. परंतु रस्त्याच्या अयोग्य स्थितीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.