चार आरोपींना धारदार शस्त्रासह पळसे गाव येथील मक्याच्या शेतात ना.रोड पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.पळसे गावातील पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी 112 या क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली की,पळसे गावातील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मक्याच्या शेतामध्ये पाच संशयित दरोडाच्या प्रयत्नाने लपून बसले आहे. त्यानुसार नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत चार जणांना ताब्यात घेतले परंतु एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे.