महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत आज दिनांक 4 सप्टेंबरला दुपारी एक वाजता मोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, रोजगार सेवक यांना या कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या कार्यशाळेला असल्याचे दिसून आले