आज दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दिग्रस शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून समोर येत आहे. पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुरीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा १० वाजेपर्यंत पाऊस सुरूच असल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये अधिक भर पडली.