प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर द्वारा प्राप्त पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि.१२ व १६ सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी, तर दि. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान सार्वत्रिक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.दि. १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.दि.१३ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.