नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात ४ सप्टेंबर रोजी रात्री मंगूशेठ मार्केटमध्ये प्रशांत कुलकर्णी या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी ५ सप्टेंबर रोजी रात्री शहादा पोलिसात गौरव मुरलीधर तावडे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.