एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना नोंदविण्यात आली आहे. ही घटना दि. ८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. ३८ वर्षीय फिर्यादी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात इसमाने फिर्यादीच्या मुलीस फूस लावून पळवून नेले. मुलीचे वय १७ वर्षे असून ती बारावी इयत्तेत शिक्षण घेत आहे.