यंदाच्या गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर शनीवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून शहरात पर्यावरणाची काळजी घेत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने एक अभिनव ‘निर्माल्य संकलन’ मोहीम राबवली. गणेश विसर्जन झाल्यानंतर शहराच्या प्रमुख चौकांमध्ये आणि विसर्जन घाटांवर जमा होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिष्ठानचे १०० ते १५० स्वयंसेवक सज्ज झाले होते.