उदगीर ग्रामीण पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी उदगीर बिदर रोडवर गुटख्याची वाहतूक करणारी कार जप्त केलीय,गुप्त महितीदाराने एका कार मधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली होती,मिळालेल्या माहितीनुसार उदगीर ग्रामीण पोलिसांनी नाका बंदी लावली होती, नाका बंदी दरम्यान बिदरकडून उदगीरकडे येणारी कार पोलिसांनी अडवून कारची तपासणी केली असता कार मध्ये गुटखा आढळून आला, गुटखा व कार पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपींला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिली