बुलढाणा शहरातील जुन्या गावातील मिलिट्री प्लॉट परिसरात ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी घरासमोर लिंबू-बाहुली टाकल्याच्या संशयावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. वादात शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून चंद्रकला शेवाळे,विजू दुरणे, गणेश परसे व इतर ३ अशा ६ जणांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.