सुरू असलेल्या गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर भुसावळ पोलीस दलाने तयारी सुरू केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी सोमवारी १ सप्टेंबर रोजी भुसावळ येथील आरपीएफ बॅरिक मैदानावर दुपारी १२ वाजता पोलीस दलातर्फे 'मॉक ड्रिल'चे आयोजन करण्यात आले होते. या सरावात पोलीस अधिकारी आणि होमगार्ड यांनी जमावाला पांगवण्यासाठी फायरींगचाही सराव केला, ज्यामुळे पोलिसांची सक्षमता दिसून आली.