आज पहाटे ६.४० च्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ वर एक भीषण अपघात झाला. एका मोठ्या खड्ड्यामुळे झालेल्या या अपघातात एका ट्रकने आयशरला जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात आयशरचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील एक मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या आयशरला धडक दिली.