आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी अपघातग्रस्त तरुणाला मदत करत त्याला रुग्णालयात आपल्या वाहनाने पाठवले आहे ,यावेळी आमदार नारायण कुचे हे बदनापूर येथून अंबडच्या दिशेने जात असताना दुचाकी स्लिप होऊन बदापूर जवळ एका तरुणाचा अपघात झाला यावेळी त्या ठिकाणी आमदार नारायण कुचे यांनी त्या अपघातग्रस्त तरुणाला स्वतः उचलत आपल्या गाडीत जालना रुग्णालयात हलवले.