जळगाव शहरातील एका भागातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता एम.जे.कॉलेज परिसर येथे घडली. या संदर्भात, रामानंदनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.