मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथे आलेल्या पुरामुळे स्थानिक शेतकऱ्याचे अन्नधान्य व जनावरांचे पशुखाद्य पूर्णतः पाण्यात गेले असून तो गंभीर अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी बुधवार, दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी खासदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी गटाचे उमेश पाटील तसेच मोहोळचे तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.