खऱ्या नोटाच्या मोबदल्यात बनावट नोटा देऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदेगाव मार्गावर अटक केली होती.या कारवाई मध्ये पोलिसांनी तब्बल साडेनऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता.आरोपी वासुदेव चव्हाण सह ताब्यात घेतलेल्या 7 ही आरोपींना न्यायालयांमध्ये हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयांमध्ये हजर केले असता सातही आरोपींची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली.