ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन क्रीडा क्षेत्राला नवी दिशा आणि आदिवासी तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभमुहूर्तावर पालघर जिल्ह्यात पावसात क्रीडा महोत्सव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महोत्सवाची घोषणा पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. खेळात भारत जगातील महासत्ता बनावा या स्वप्नाला बळ देण्याकरिता प्रधानमंत्रींच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.