शिरसाड- वज्रेश्वरी मार्गावर टेम्पोचा भीषण असा अपघात घडला आहे. भिवंडीहून शिरसाटच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पोने चांदीप परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघातात टेम्पोच्या केबिनचा चचेंदामेंदा झाला असून मोठे नुकसान झाले आहे.