मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. हा ब्लॉक सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि एलटीटी या स्थानकावर येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या सुमारे १८ एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील.