विचुंरी–पाढुंर्ली रस्ता पावसामुळे खड्ड्यांनी भरून दुरवस्थेला आला असून प्रवासी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर अनेक अपघात घडले असून नागरिकांनी डागडुजी व डांबरीकरण न करता काँक्रीटचा रस्ता करावा अशी ठाम मागणी खासदार-आमदारांकडे केली आहे. हा रस्ता भगुर, देवळाली कॅम्प तसेच नाशिक रोडला जोडणारा असल्याने येथे मोठी वाहन वर्दळ असते. शेतकरी याच मार्गाने आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात असल्याने वाहतुकीला विशेष महत्व आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्त