नथुराम गोडसे होण्याची धमकी देणाऱ्या संग्राम भंडारेंच्या समर्थनासाठी गोपीचंद पडळकर मैदानात, म्हणाले, 'ते हिंदू धर्माच्या रक्षणासाठी...' दोन दिवसांपूर्वी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हणत थेट धमकीच दिली.