मातामाय देवस्थान संस्थान कटंगी येथे आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी बुधवार ला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास श्री गणेश चतुर्थी निमित्त विशेष पुजा अर्चना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधिवत माता माय देवस्थान येथे श्री गणेश चतुर्थी निमित्त पूजन करण्यात आले. यावेळी मातामाय देवस्थानचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी फणींद्र हरीनखेडे यासह मोठ्या संख्येत भाविक भक्तगण, माता माय देवस्थानाचे ट्रस्टी आदी उपस्थित होते.