हिंगोली मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या लाखो आंदोलकांसाठी हिंगोली जिल्ह्यातून भोजनाचे साहित्य पाठवली जात आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथून आज दिनांक एक सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथील आंदोलकांसाठी वीस क्विंटल च्या पोळ्या तर पाच क्विंटल मिरची ठेचा पाठवला आहे अशी माहिती आज सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली आहे.