अमळनेर तालुक्यात गुरांवरील लंपी आजाराने थैमान घातले असून, कळमसरे आणि परिसरातील अनेक गावांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कळमसरे, पाडळसरे, खेडी, वासरे, निम, तांदली आणि मारवड यांसारख्या गावांमध्ये गायी, म्हशी, बैल आणि लहान वासरेही या रोगाच्या विळख्यात सापडली आहेत. दरम्यान लसीकरण हे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा पशुधन विकास अधिकारी वैशाली संधांनशिव यांनी शनिवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दिले आहे.