आज दि तेरा स्पटेंबर रोजी दुपारी चार वा.कन्नड ग्रामीण पोलिसांनी गौताळा अभयारण्यात सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा केला आहे. सायगव्हान शिवारातील सनसेट पाँईंट परिसरात २६ ऑगस्ट रोजी निखिल हिरामण सूर्यवंशी (२८, रा. शिंधी, ता. चाळीसगाव) याचा मृतदेह आढळून आला होता. जबड्याला गंभीर जखमा असल्याने संशय निर्माण झाला होता.या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करून मृताच्या मित्रपरिवार व नातेवाईकांची चौकशी करण्यात आली. तपासात त्याचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर (३५, रा. शिंधी) याच्यावर संशय घेतला.