समुद्रपूर तालुक्यात मागणी दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर सोयाबीन पिक हिरावून नेले.या झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी,माजी आमदार राजू तिमांडे यानी ऐल्गार पुकारत तहसिल कार्यालयावर धडक देत तहसीलदांना मार्फत मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना निवेदन पाठविले.