राहाता येथे महाविकास आघाडीच्या वतीने प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वामध्ये जन सुरक्षा कायद्या विरोधात निदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात नागरिकांच्या मौलिक हक्कांवर घाला घालणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड परिणाम करणाऱ्या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा 2024 विरोधात जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे, भाकप आणि घटक पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.