गोंदिया रेल्वे स्थानकावर उभी असलेली रेल्वेची एक्सीडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन ला अचानक आग लागली. यामुळे रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.. मात्र या व्हॅन मधील साहित्य जळून खाक झाले. तर ही आग लागल्यामुळे काही काळापर्यंत रेल्वे गाड्यांचा वेळापत्रक कोलमडले होते. रेल्वे विभागाच्या कर्मचार्यांनी तात्काळ ही आग आटोक्यात आल्यानंतर आता रेल्वे वेळापत्रक पूर्ववत करण्यात आले आहे.