गडचिरोली पोलिसांच्या 'पोलीस दादालोरा खिडकी' (जनसंपर्क) उपक्रमांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आणि शासनाच्या विकास योजनांमुळे प्रभावित होत, भामरागड तालुक्यातील मौजा मरकणार येथील ग्रामस्थांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या गावाने एकमताने माओवाद्यांना 'गावबंदी' करण्याचा ठराव संमत करत, विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्धार केला