पंढरपूर शहरातील बहुचर्चित अभिषेक कदम खूनप्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुका अध्यक्ष संदीप मांडवे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. विक्रांत फताटे यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता पत्रकारांशी बोलताना दिले. अभिषेक कदम हा अनिल नगर, पंढरपूर येथे गेला असता, त्याचा नवनाथ अटकळे, मेहुणा सागर शिंघण, पुतण्या अमोल अटकळे तसेच नातेवाईक संदीप मांडवे यांनी शारीरिक व मानसिक छळ करून ठार मारल्याचा आरोप आहे.