30 ऑगस्ट ला दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. नोंदी मिळालेल्या 54 लाख मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे ते पाहता सरकार दबावात निर्णय घेण्याची भीती ओबीसी समाजात आहे. मात्र दबावात येऊन निर्णय घेतल्यास वा तसे दिसल्यास आम्हीही आंदोलनाची तीव्रता वाढवू असा रोखठोक इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे..