प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एक-दोन ठिकाणी जोरदार तर इतर सर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.