मिरजेतील विजापूर वेस येथे सोमवारी दुपारी ट्रॅक्टर आणि सायकल च्या अपघातात शालेय विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली आहे सदरची जखमी शालेय विद्यार्थिनी क्लास ला जात असताना विजापूर वेस येथे अपघात घडला या अपघातात मात्र सदरच्या मुलीच्या सायकलचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे सायकल पूर्णपणे ट्रॅक्टर डब्याच्या चाकात अडकली मुलीच्या प्रसंग सावधानतेमुळे मात्र पुढील अनर्थ टळला या घटनेनंतर या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती या घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले