महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट आणि किल्ला भागातील रस्त्याच्या ठिकाणी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शनिवारी दुपारी 1 वाजता महानगरपालिकेकडून माती मिश्रित मुरूम टाकून खड्डे भरण्याचे काम चालू होते. सदरवेळी स्थानिक मिरजकर नागरिकांनी सदरचे काम निकृष्ट व तात्पुरते मलमपट्टी असल्याचे सांगून काम बंद पाडले. महापालिका प्रशासनाने तात्पुरता माती मिश्री मुरूम टाकून डागडुजी न करता कॉन्ट्रॅक्टदाराला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये रस्त्यावर खड्डे पडले तर पॅचवर्क करणे बंधनकारक आहे असे सांगून पॅचवर्क झा