श्री.मारुती गणेश मित्र मंडळ व श्री.पांडुरंग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच डॉक्टर असोसिएशन व देऊळगाव माळी येथील सर्व फार्मासिस्ट यांच्या विषयी सहकार्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.सदरील आरोग्य शिबिर संपन्नतेसाठी श्री मारुती गणेश मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, दे.माळी येथील सर्व फार्मासिस्ट, डॉ.असोसिएशन, यांनी परिश्रम घेतले.