उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवास्थानी मुंबईतील आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका आणि मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या संभाव्य युतीबद्दल मोठी उत्सुकता आहे. आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर दुपारी एक वाजता ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे.