दिनांक 24 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट च्या 6 ते 2:00 वाजेच्या दरम्यान रेल्वे स्टेशन गोंदियाच्या पार्सल ऑफिसच्या बाजूच्या गल्लीत फिर्यादी अमित तांडेकर यांनी आपली मोटरसायकल हँडल लॉक करून ठेवली होती. मोटरसायकल क्रमांक एम एच 35 यु 6449 हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची किंमत 30 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:45 वाजता शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.