धुळे शहरातील रामदेव बाबा नगरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. घरातून बाहेर पडलेली मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र ती न मिळाल्याने वडिलांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.